-20%

आयुष्याच्या सायंकाळी


पुस्तकाचे नांव : आयुष्याच्या सायंकाळी
लेखकाचे नांव : रा. रं. बोराडे
प्रकार : कादंबरी
किंमत : 150 रु
पहिली आवृत्ती : 9 जुलै 2017

120.00  150.00 

पुस्तकाचे नांव : आयुष्याच्या सायंकाळी Aayushyachya Sayankali
लेखकाचे नांव : रा. रं. बोराडे 
R. R. Borade
प्रकार : कादंबरी
किंमत : 150 रु
पृष्ठ संख्या : 130
पहिली आवृत्ती : 9 जुलै 2017

उच्च शिक्षणाचं प्रमाण जसं जसं वाढत चाललेलं आहे तसतशी वृद्धाश्रमातील वृद्धांची संख्या देखील वाढत चालली आहे. ‘आपल्या वंशाला दिवा हवा, मुलगा हवा’ असा अट्टाहास धरणारी, त्यासाठी गर्भजल चिकित्सा करणारी व मुलीचा गर्भ असेल तर काढून टाकणारी माणसे आपल्या समाजात आहेत.

आपण जन्म दिलेल्या मुलानं सर्वाथानं मोठं व्हावं, आपल्या ‘आयुष्याच्या संध्याकाळी’ त्यानं आपल्याला आधार द्यावा, आपल्या आयुष्याची संध्याकाळ सुखानं व्यतीत व्हावी, एव्हढीच अपेक्षा आपल्या मुलाकडून आई-वडिलांची असते. मात्र हे दिवटे काय करतात तर त्यांना म्हातारपणी वृद्धाश्रमाची वाट धरायला भाग पाडतात.

हे लोण आता ग्रामीण भागापर्यंत गेले आहे. नात्यानात्यातला वाढत चाललेला तुटकपणा, शेतीचे मोठ्या प्रमाणात होत चाललेलं विभाजन, या विभाजनामुळे वाटणीला आलेली तोकडी जमीन, नांदत्या घराचेही होत चाललेलं विभाजन, या विभाजनामुळे हातपाय पसरणं देखील अवघड व्हावं, अशा घरात करावा लागत असलेला प्रपंच, परिणामी घरातील म्हाताऱ्या-म्हातारीची होत चाललेली हेळसांड, कुंचबणा हे सारं लक्षात घेऊन आता ग्रामीण भागातही वृद्धाश्रमाची आवश्यकता निर्माण झालेली आहे.

आपल्या जन्मगावातल्या म्हातारा-म्हातारीची होत चाललेली हेळसांड लक्षात घेऊन त्या गावातला एक सेवानिवृत्त शिक्षक एक वृद्धाश्रम सुरू करतो. हा वृद्धाश्रम हाच या कादंबरीचा विषय आहे…

संवेदनशील माणसाला अंतर्मुख करून विचार करायला भाग पाडणारा…

Based on 0 reviews

0.0 overall
0
0
0
0
0

Be the first to review “आयुष्याच्या सायंकाळी”

There are no reviews yet.