Product Description

पुस्तकाचे नांव : काव्यगंगेच्या तटावर Kavyagangechya Tatawar
लेखकाचे नांव : डॉ. आशा सावदेकर Dr. Asha Savdekar
प्रकार : काव्यसमीक्षा
किंमत : 175 रु
पृष्ठ संख्या : 188
पहिली आवृत्ती : 12 ऑक्टोबर 2005 (विजयादशमी)

या संग्रहातील लेखांमध्ये काही संशोधन लेख आहेत. जसे, आधुनिक ग्रामीण कविता, कविश्रेष्ठ अनिल यांची खंडकाव्ये इत्यादी. काही कवींवर लेखिकेने दोनदा, तीनदा वेगळ्या वेगळ्या अंगांनी प्रसंगोपात्त सर्जनशील समीक्षा लिहिल्या त्याही यात समाविष्ट केल्या आहेत. जसे कवी ना. घ. देशपांडे, कवी ग्रेस आणि सुरेश भट यांच्यावरील लेखन. कुसुमाग्रज आणि इंदिरा संत यांच्या अखेरच्या कवितासंग्रहाच्या निमित्ताने त्यांच्या एकूणच पृथगात्मतेवर लेखिकेने प्रकाश टाकला. म. म. देशपांडे, बोरकर-कुसुमाग्रज, कवी तांबे आणि बोरकर यांच्या काव्यातील गूढवाद, अरुणा ढेरे यांच्या कवितेतील सूत्र शोधण्याचा प्रयत्न हे लेख वेगवेगळ्या दिवाळी अंकांमध्ये प्रकाशित झालेले लेख आहेत. कवी यशवंत मनोहर आणि श्रीपाद जोशी यांच्यावर झालेले लेखनही प्रसंगविशिष्ट असले तरी त्यात नवदर्शनाचा भाग आहे.