Product Description

पुस्तकाचे नांव : मानसीचा शिल्पकार तो…

मानसीचा शिल्पकार तो.. हे पराग घोंगे यांचे कला आणि कला – व्यवहार यांच्यातील सनातन संघर्षाचे चित्रण करणारे गंभीर नाटक आहे. एक आंतरराष्ट्रीय ख्यातीचा शिल्पकार हा संघर्ष कसा हाताळतो आणि कलाव्यवहाराला कलेपासून कसे पृथक करतो याचे चित्रण प्रस्तुत नाटकातून घडते.. कलावंत आपल्या कलेतून प्रत्यक्ष ईश्वराला जन्म देणारा निर्माता असतो हे भान कलावंताच्या ठायी कधीतरीच प्रकट होते, हे नाटक त्या कलावंताच्या आत्मभानाचे नाटक आहे.

 

पुस्तकाचे नांव : आभाळ सावल्यांचे

आभाळ सावल्यांचे  हे पराग घोंगे यांचे नाटक आयुष्याच्या संध्याकाळी सर्वसामान्य माणसाच्या मनात नकळत डोकावणाऱ्या पिवळ्या उन्हाचे नाटक आहे. या अवस्थेशी माणसे कशी जुळवून घेतात आणि कधी – कधी या प्रयत्नात यांची कशी तारांबळ उडते याचे खेळकर चित्रण या नाटकातून घडते. सगळे खेळ शेवटी माणसांसाठीच निर्माण झाले असतात आणि ते त्याच्या आनंदासाठीच खेळले जातात याकड हे नाटक लक्ष वेधते..