Product Description

पुस्तकाचे नांव : समीक्षेची क्षितिजे Samikshechi Kshitije
संपादक : डॉ. श्यामला मुजुमदार Dr. Shyamla Mujumdar
प्रकार : साहित्य समीक्षा
किंमत : 300 रु
पृष्ठ संख्या : 248
पहिली आवृत्ती : 17 जुलै 2008

‘समीक्षा’ हा सर्जनशील वाङ् मयप्रकार आहे हे ज्यांच्या समीक्षेने सिद्ध केले त्या समीक्षक डॉ. द. भि. कुळकर्णी यांच्या अमृतमहोत्सवानिमित्ताने सिद्ध झालेला ‘समीक्षेची क्षितिजे’ हा ग्रंथकलश वाचकांच्या हातात देत आहोत.

प्राचार्य म. द. हातकणंगलेकर, डॉ. उषा देशमुख, डॉ. रमेश धोंगडे, डॉ. अश्विनी धोंगडे, डॉ. शुभांगी पातुरकर, डॉ. वीणा मुळे इ. मान्यवरांनी या विविध समीक्षारूपांचा वेध येथे घेतला आहे.

साहित्याचे अभ्यासक, अध्यापक-संशोधक यांच्या साहित्यचिंतनाला हे समीक्षामंथन साह्यभूत ठरेल.