Product Description

पुस्तकाचे नांव : अदृष्टाच्या वाटा adrushtachya vata
लेखकाचे नांव : रवींद्र शोभणे ravindra shobhane
प्रकार : कथासंग्रह
किंमत : 250 रु.
पृष्ठ संख्या : 265
प्रकाशन दिनांक : जून 2008
आवृत्ती : पहिली आवृत्ती
पुस्तकाच्या आतील माहिती :
मराठी कथेचा प्रवाह वाहता ठेवणाया आणि त्याला बरावाईट आकार देणारया आजच्या मोजक्या कथाकारांमध्ये रवींद्र शोभणे यांचं नाव घ्यावं लागेल. रवींद्र शोभणे यांच्या कथा दोन स्तरांवर घडतात. एका स्तरावर त्या सामाजिक वळणाच्या कथा आहेत, तर दुसया स्तरावर त्या मानवी विकारवशतेचा आणि नात्याचा शोध घेताना दिसतात. काही कथांमधून ते लोककथेला साजेशा अशा अद्भुताचा आश्रय घेताना दिसतात. त्यामुळे त्यांचा ओढा वास्तव अनुभवाच्या चित्रणापेक्षा आदिम वासना-विकारांच्या गूढतेकडे अधिक आहे. असं वाटत राहतं.
शोभणे यांच्या कथेतलं वातावरण यालाही एक वेगळं अस्तित्व आहे. सामाजिक वास्तवाचा भाश्यकार म्हणून शोभणे एकीकडे विश्लेशकाची भूमिका वठवत असतानाच जीवनातल्या अतक्र्यतेचं भान त्यांच्या मनात जागं असतं. त्यामुळे स्त्रीचा आत्मसन्मान, पुरुशप्रधान समाजरचनेत तिचा होणारा कोंडमारा त्यांच्या कथेत येतो; आणि संगीताचं नादब्रम्ह, दैवतकल्पना, भोवतालच्या मुक्या प्राण्यांची सृश्टी आणि निसर्ग यांच्या चित्रणातून तर्कातीत आणि माणसाच्या नियंत्रणापलिकडील जीवनोर्मीचं चित्रणही येतं. रवींद्र शोभणे आता लेखक म्हणून एका महत्त्वाच्या वळणावर उभे आहेत. कथालेखनातला कथा-दीर्घकथा असा प्रवास करीत ते आता महाकादंबरीकडे वळले आहेत. त्यांच्या भावी लेखनाचा विचार करताना कथालेखक शोभणे यांचा विचार करावाच लागेल. कारण लेखक म्हणून त्यांच्या विकासाची बिजं या कथांमध्ये विखुरलेली आहेत.
– दीपक घारे