Product Description

पुस्तकाचे नांव : मराठीतील सत्य, शिव आणि सौंदर्यविचार Marathitil Satya, Shiv Aani Saundryavichar
लेखकाचे नांव : डॉ. शशिकान्त लोखंडे Dr. Shashikant  Lokhandeडॉ 
प्रकार : साहित्य समीक्षा
किंमत : 500 रु
पृष्ठ संख्या : 332
पहिली आवृत्ती : 6 जून   2019 

मुळात ‘सत्यं शिवं सुंदरम्’ ही त्रैक्यसंकल्पना भारतीय नाही. ती अभारतीय आहे. तिची बीजे/मुले ग्रीक संस्कृतीतील विचारांत आहेत. पायथॅॅगोरस, सॉंक्रेटीस, प्लेटो, अँँरिस्टॉटल ह्यांनी ही मुल्यसंकल्पना प्रसारित केली. तिचा भारतीय तत्त्वज्ञानातील ‘सत्  चिद्  आनंद’शी काहीएक संबंध नाही . वेद, उपनिषदे, आरण्यके, आर्ष महाकाव्य ह्यांत कुठेही ही संकल्पना नाही. किमान त्रैक्यरुपात तरी कुठेही नाही.

मूळ प्रबंध ‘सत्य सुंदर मंगल’ असा आहे. त्याचे भाषांतर ज्योतिरिन्द्रनाथांनी ‘सत्यंं शिवं सुंदरम्’ असे केले. त्यांनी सत्यचे ‘सत्यम्’ , शिवचे ‘शिवम्’ व सुंदरचे ‘सुंदरम्’ असे रूप केले. महर्षी देवेंन्द्रनाथांनी ब्राम्होसमाजाच्या प्रार्थनेत त्याचा समावेश केला. पुढे तेथून मराठीत वा. गो. आपटे ह्यांनी ह्या संकल्पनेला मराठी साहित्यविचारात मानाचे  स्थान दिले.