पुस्तकाचे नांव : ओली रात्र आणि इतर एकांकिका
ओली रात्र आणि इतर एकांकिका हा पराग घोंगे यांचा तिसरा एकांकिका संग्रह आहे. यापूर्वी त्यांचे अंधारकैद आणि इतर एकांकिका आणि अॅस्थेटिका आणि इतर एकांकिका हे एकांकिका संग्रह विजय प्रकाशन तर्फे प्रकाशित झाली आहेत. या संग्रहात चार एकांकिकांचा समावेश आहे. अगदी वेगवेगळे नाट्यानुभव या एकांकिकांतून प्रत्ययाला येतात. एकांकिका हे रंग – अभिव्यक्तीचे सशक्त मध्यम आहे हे या प्रयोगक्षम एकांकिकातून पुन: प्रत्ययाला येते. अनुभवाची तीव्रता आणि अर्थाची प्रसरणशीलता हे गुण जर लेखनात असतील तर एकांकिका प्रभावी होतातच हे सूत्र या एकांकिकांतून स्पष्टपणे जाणवते..
There are no reviews yet.