-20%
, , ,

चौफेर नगरी काही गूढ…! काही आनंद…!


पुस्तकाचे नांव :    चौफेर नगरी काही गूढ…! काही आनंद…! 
लेखकाचे नांव : श्रीकांत पवनीकर    
प्रकार : प्रवास
पृष्ठसंख्या : 230
किंमत :  499 रु
पहिली आवृत्ती : 15  ऑगस्ट  2024

प्रकाशक : विजय प्रकाशन

400.00  499.00 

पुस्तकाचे नांव :    चौफेर नगरी काही गूढ…! काही आनंद…! Choufer Nagari
लेखकाचे नांव : श्रीकांत पवनीकर  Shrikant Pawnikar  
प्रकार : प्रवास
पृष्ठसंख्या : 230
किंमत :  499 रु
पहिली आवृत्ती : 15  ऑगस्ट  2024

प्रकाशक : विजय प्रकाशन

सर्वसामान्य लेखक जे विषय कधीही हाताळणार नाही अशा विषयांची निवड लेखकाने केली आहे. आणि ज्या विषयांवर अनेक पानं लिहिल्या गेली आहेत अशा विषयातला अप्रकाशित पैलू शोधून त्यावर प्रकाशझोत टाकण्यात आलेला आहे. लेखांची लांबी मर्यादित ठेवण्यात आणि तरीही सगळी माहिती त्यात गुंफण्यात लेखक यशस्वी झाला आहे. मग ती प्रश्न विचारण्यासाठी लांबचा प्रवास करून आलेली शिबा राणी असो की भारतीय तत्त्वज्ञानाचं आगर फारसी भाषेत आणण्यासाठी जीव गमावलेला दारा शुकोह. क्रूरकर्मा औरंगजेब असो की नाझी भस्मासुर हिटलर असो.

मृत्यू, पुनर्जन्म, आत्मा, भूत प्रेत, मोक्षप्राप्तीच्या खुळचट कल्पना यावर हा संवेदनशील लेखक व्यक्त होतो त्यावेळी आपण अंतर्मुख होतो. लयाला गेलेली माया संस्कृती, ‘एलडोराडो’ – शोध एका सुवर्णभूमीचा… हे लेखही मनात रेंगाळतात.

श्रीकांत पवनीकर वाचकाला आपल्या अनुभवात बुचकळून काढतात या माझ्या विधानाची सत्यता पडताळून बघायलाच हवी !!!

या, एका भाबड्या, शब्दवेड्या, बोलघेवड्या मुशाफिराच्या ‘चौफेर नगरी’त तुमचं स्वागत आहे !

Based on 0 reviews

0.0 overall
0
0
0
0
0

Only logged in customers who have purchased this product may leave a review.

There are no reviews yet.