पुस्तकाचे नांव : नियोजन आणि व्यवस्थापनाचे दीपस्तंभ : युगंधर शिवराय Niyojan Aani Vyavasthapanache Deepstambh : Yugandhar Shivray
लेखकाचे नांव : डॉ. सुमंत दत्ता टेकाडे Dr. Sumant Datta Tekade | Ed. by. Dr. Shyam Madhav Dhond
प्रकार : आत्मचरित्र
पृष्ठसंख्या : ३४६
किंमत : ६०० रु
पहिली आवृत्ती : २ एप्रिल २०२५
प्रकाशक : विजय प्रकाशन
छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे युगनिर्माते राष्ट्रपुरुष ! महाराष्ट्राचे भाग्यविधाते ! तमाम मराठी मनांचे मानबिंदू !
इतिहास अनेक अंगांनी लिहिला जातो तसेच सांगितला जातो. छत्रपती शिवाजी महाराजांचे उदाहरण घ्यायचे झाल्यास त्यांचे स्थुल चरित्र, त्यांची राजनीती, त्यांची स्वराज्यविषयक कल्पना, त्यांचे अर्थशास्त्र, त्यांची युद्धनीती, त्यांचे परराष्ट्रीय धोरण, जागतिक पातळीवरील त्यांचे व्यक्तिमत्त्व अशा विविधांगांनी चिंतन करणे आवश्यक आहे, आनंदाची गोष्ट म्हणजे, अनेक अभ्यासक शक्य तेवढे तसे करीतही आहेत.
‘युगंधर शिवराय’मधून डॉ. सुमंत टेकाडे यांनी शिवरायांचे स्वराज्य निर्मितीमागील प्रभावी नियोजन व यशस्वी व्यवस्थापन यांचा अभ्यासपूर्ण वेध घेतला आहे. शिवप्रभूचे दूरदर्शी नेतृत्व, असामान्य कर्तृत्व आणि अद्भुत नेटवर्किंग यांचीही मार्मिक उकल केली आहे. राजांची चाकोरीबाहेरचा विचार करण्याची वृत्ती (आऊट ऑफ द बॉक्स थिंकिंग) आणि जोखीम पत्करण्याची क्षमता (रिस्क टेकिंग अॅबिलिटी) याचाही लेखकाने विशेष परामर्श घेतला आहे.
महाराजांचे माणसे पारखण्याचे कौशल्य तसेच विपरीत काळातही संतुलन व मनोबल राखण्याचे धैर्य, यांसारख्या त्यांच्या विविध गुणवैशिष्ट्यांचे दर्शन या पुस्तकातून घडते.
शिवाजीराजांची राजनीती, युद्धनीती व अर्थनीती तद्वतच, त्यांची स्वराज्यसंकल्पना व परराष्ट्रधोरण यांचा डॉ. सुमंत टेकाडे यांनी ‘नियोजन आणि व्यवस्थापनाचे दीपस्तंभ ‘युगंधर शिवराय’मधून कालोचित वेध घेतला आहे.
शिवरायांच्या गुणविशेषांची आजच्या काळाशी लेखकाने घातलेली सांगड अत्यंत उद्द्बोधक आहे. त्यामुळे हे पुस्तक विविध क्षेत्रांतील कार्यरत व्यक्ती, विद्यार्थी आणि संस्थांसाठीही प्रेरक आणि मार्गदर्शक झाले आहे. प्रत्येक शिवप्रेमींनी जवळ बाळगावे, असेच हे पुस्तक आहे.
There are no reviews yet.