-20%

पालकमैत्री


पुस्तकाचे नांव : जगण्यातले काजवे Jaganyatale Kajve
प्रकार : ललित
पृष्ठसंख्या : १२०
किंमत :  २५० रु
पहिली आवृत्ती : ३० एप्रिल २०२५

प्रकाशक : विजय प्रकाशन

160.00  200.00 

पुस्तकाचे नांव : पालकमैत्री Palakmaitri
प्रकार : मार्गदर्शनपर
पृष्ठसंख्या : ९८
किंमत :  २०० रु
पहिली आवृत्ती : ३० एप्रिल २०२५

प्रकाशक : विजय प्रकाशन

बालक व पालक यांचेमध्ये मैत्रीचे निकोप नाते निर्माण झाले तरच ते शक्य आहे. यासाठी सुसंवाद हे उत्तम माध्यम आहे. दोघांनीही एकमेकांना महत्व दिले पाहिजे, पालकांनी आपल्या पाल्यांना समजून घेऊन व स्वतःच्या आचरणातून संस्कार करीत विश्वासास पात्र बनवले पाहिजे. वर्तनाच्या मानसशास्त्राचा अभ्यास हा प्रत्येक जागरूक पालकास असला पाहिजे व त्यानुसार विविध योजनांची आखणी करीत दोन्ही पिढ्यांतील अंतर अधिकाधिक कमी करीत नेले तर असे करणे सहज शक्य आहे. याकरिता पुढाकार प्रत्येक पालकाने घ्यावा. सहनशक्ती व संयमीवृत्ती याकरिता फार आवश्यक आहे. प्रथमतः तरुणांकडून फार जास्त अपेक्षा न करता हळूहळू अत्यंत प्रेम व आपुलकीने त्यांना या साच्यात बसवता येऊ शकते. पालकांना यासाठी आत्मपरिक्षणाची सुद्धा गरज आहे. ‘आधी केले मग सांगितले’ या तत्याचा अंगिकार फारच प्रभावी ठरत असतो. विद्यार्जन करणारा बालक हा सतत शिकत असतो. याच संधीचा फायदा घेऊन पोषक असे विचार व त्यानुसार आचरण करणे शिकवावे लागते. आत्मसंयम व संवेदनशीलता जपण्यास शिकवणे अत्यंत गरजेचे आहे. परंतु त्यासाठी नैतिकतेचे अधिष्ठान सर्वांत महत्त्वाचे आहे. त्यासाठी चंगळवाद, भोगवृत्ती व असंवेदनशीलता यांचा प्रभाव कमी करत नेऊन त्यांना साधेपणा, परोपकार व सकारात्मक विचारसरणीकडे घेवून जावे लागेल यासाठी पालकाने आपली पालकत्वाची भूमिका प्रामाणिकपणे पार पाडली तर हे सर्व सहज शक्य आहे. यासाठी मुलांकडून अतिरेकी अपेक्षा न करता त्यांच्याशी मैत्री करावी. त्यांना समजून घ्यावे, संवाद साधावा. त्यांना वेळ द्यावा. आपण किती वेळ देतो यापेक्षा तो कसा देतो हे महत्त्वाचे असते. पालकत्व ही जबाबदारी आहे. व ती आपल्या कर्तव्याचा भाग म्हणून पार पाडावी. आपली भूमिका जेथे बदलण्याची गरज असेल तेथे ती वेळीच बदलणे हे त्याहूनही आवश्यक आहे.

काळ आता बदलला आहे. पालकाने आदेश द्यायचा व तो बालकाने कुठलाही प्रश्न न विचारता मुकाट्याने पाळायचा असा काळ आता राहिलेला नाही. माहिती व ज्ञानाच्या स्फोटाबरोबरच आचार विचारांचाही स्फोट होऊ लागलेला आहे. अशा या बदलत्या काळाची चाहूल लागल्यावरही त्याकडे जर दुर्लक्ष केले तर या आधुनिक काळात अनेक समस्या निर्माण होऊ शकतात त्यामुळे बालक व पालक यांच्यामधील अंतर कमी होऊन त्यांच्यामध्येही मैत्रीचे वातावरण निर्माण झाले पाहिजे. वरवर तसे होताना दिसत असले तरी वस्तुस्थिती मात्र तशी नाही. जुन्या पिढीला सतत आपण शहाणेच आहोत असे वाटत असते. तर त्याऊलट नव्या पिढीला आपण जुन्यापेक्षा आधुनिक असून … ‘त्यांना काय कळतं…..’ अशा अविर्भावात ही पिढी असते. त्यामुळे या दोन्ही पिढ्यांमध्ये सुसंवाद असणे हीच तर खरी गरज आहे.

Based on 0 reviews

0.0 overall
0
0
0
0
0

Only logged in customers who have purchased this product may leave a review.

There are no reviews yet.