पुस्तकाचे नांव : वाचनकलेचे शास्त्र Vachankaleche Shastra
प्रकार : मार्गदर्शनपर
पृष्ठसंख्या : ४१
किंमत : १०० रु
पहिली आवृत्ती : १५ नोव्हेंबर २०२४
प्रकाशक : विजय प्रकाशन
भारतीय संस्कृतीने सांगितलेल्या चौसष्ट कलांमध्ये वाचन कलेचा अंतर्भाव आहे. तसेच चौदा विद्यांमध्ये भाषा, लिपी व उच्चारशास्त्र यासंबंधीचा उल्लेख आढळतो.
सुसंस्कारही । वाचन हा एक उत्तम छंद आहे. जो ज्ञान व आनंद देतो ! सोबत
आनंद देणारी गोष्ट म्हणून पुस्तक हा आपला नवीन मित्र सहज होतो. कधीही साथ न सोडणारा !
वाचन जीवनाला नवीन दिशा देऊन विचार करायला शिकवते. योग्य अयोग्य ची निवड करताना अंतर्मुख करते; आणि त्या विचार मंथनातून, व्यक्ती श्रेयस असणारी गोष्टच निवडते. पर्यायाने वाचनाने सुपंथे मार्गक्रमण होते.
प्रकट वाचनामुळे वाणी संस्कारीत होते! उच्चारण शुद्ध होते! संबाद क्षमता वाढते ! चांगले प्रकट वाचन हे भाव व विचारांचे उत्तम प्रकटीकरण करते ! संवाद कौशल्यात पारंगत झालेल्या व्यक्ती जीवनाच्या सर्वच क्षेत्रात यशस्वी झाल्याचे दाखले मिळतात !
मूक वाचन हे स्वतःला आनंद देते. डोळ्याने फक्त पाहून मेंदुने अर्थ ग्रहण होते. त्यामुळे मूक बाचनाचा वेग प्रचंड असतो. मूक वाचन हे एक प्रकारे शाती निर्माण करणारे ध्यानच होय.
अशा अनेक गुण कौशल्यांचा आलेख लेखकाने ‘वाचन कलेचे शास्त्र’ या पुस्तकात मांडला आहे !
विद्यार्थी, तरुण व वाचनाची आवड लागण्यासाठी, तसेच वाचन कौशल्य वृद्धिंगत करण्यासाठी सदरचे पुस्तक एक ‘चिंतामणी’च होय !



There are no reviews yet.