पुस्तकाचे नांव : शंकर पुण्ताम्बेकारांच्या निवडक कथा SHANKAR PUNTAMBEKARANCYA NIVADAK KATHA
लेखकाचे नांव : श्रीधर रघुनाथ दीक्षित Shridhar Raghunath Dixit
प्रकार : विनोदी कथा
पृष्ठसंख्या : १४८
किंमत : 300 रु
पहिली आवृत्ती : 14 डिसेंबर 2024
प्रकाशक : विजय प्रकाशन
श्री. श्रीधर रघुनाथ दीक्षित यांनी ‘शंकर पुणतांबेकरां’च्या निवडक कथा हे पुस्तक तयार केले आहे. त्यांच्या या कथा वेगवेगळ्या मासिकात छापलेल्या आहेत. दीक्षितांना शंकर पुणतांबेकराच्या कथात वेगळेपण जाणवलं. ते वेगळेपण ‘व्यंग’ शैलीतलं. या पुस्तकातील पहिल्या आठ कथा विनोदी आहेत. मराठीत विनोदी कथा भरपूर आहेत, पण ‘व्यंग’ हा प्रकार फक्त हिंदी भाषेतच आढळतो.
विनोद आणि व्यंग या दोघांचा संबंध विसंगती व विरूपतेशी असतो. विनोदात मनुष्य विसंगती-विरूपतेवर हसतो अन् हास्यकारकांना विसरून जातो. व्यंगात या उलट मनुष्य विसंगती-विरूपतेनं विचलीत होतो अन् अंतर्मुख होऊन विचलित करणाऱ्या कारकांविषयी विचरोन्मुख होतो. म्हणजेच विनोदाचा प्रवास स्मरणातून विस्मरणाचा असतो. मुळ विसंगती विस्मरणाचा, तर व्यंगाचा प्रवास विस्मरणातून स्मरणाचा असतो. विसंगती-कारकाच्या स्मरणाचा.
या पुस्तकातील बऱ्याच कथा व्यंगात्मक आहेत. ‘जोपर्यंत’ व ‘चित्र’ या कथेतील कारक नेता आहे. आजचे नेते फक्त स्वतःचा विचार करतात म्हणून ते स्वार्थी आहेत. तर पूर्वीचे नेते आदर्शवादी होते. देशाला प्रगतीपथावर नेणारे होते. ‘चित्र’ कथेतील उदाहरण घेऊ या. नेत्याचं चित्र कोणीतरी कापलं याबद्दल नेता आपल्या बायकोशी संवाद साधतो. त्याची बायको म्हणते, “तुमच्यासारख्या, देश किंवा राज्य चालवणाऱ्यांनी एक ध्यानात घ्यावं, स्वतःच चित्र स्वतःच करायचं नसतं. ते जनतेला करू द्या.
There are no reviews yet.