Product Description

पुस्तकाचे नांव : सखी ग सखी Sakhi Ga Sakhi
लेखकाचे नांव : पराग घोंगे Parag Ghonge
प्रकार : नाटक
किंमत : 60 रु
पृष्ठ संख्या : 56
पहिली आवृत्ती : 13 एप्रिल 2008 (रामनवमी)

नाटकाला प्ले असं म्हणतात, प्ले या शब्दाचा एक अर्थ खेळ असाही आहे. हा दीर्घांक लिहितांना लेखकाने उघडपणे एक खेळ मांडलेला आहे. बरेचदा नाटककार रंगमंचावर खेळ मांडतांना त्या आभासाला प्रत्यक्षाचा असा एक परिवेष प्रदान करतो, की रंगमंचावरचा खेळ एक वास्तवाचा तुकडाच वाटायला लागतो. ‘मेक बिलीफचे’ हे तंत्र नाटकाचा गाभाच आहे. त्यामुळे प्रेक्षक नाटकाशी समरस होतात. ‘सखी ग सखी’ लिहितांना लेखकाने सरळंच एक खेळ मांडला आहे.