-20%

बाबाराव सावरकर एक उपेक्षित राष्ट्रभक्त


पुस्तकाचे नांव : बाबाराव सावरकर एक उपेक्षित राष्ट्रभक्त Babarao Sawarkar Ek Upekshit Rashtrabhakt
प्रकार : चरित्र
पृष्ठसंख्या : १५४
किंमत :  ४०० रु
पहिली आवृत्ती : २८ मे २०२५

प्रकाशक : विजय प्रकाशन

320.00 ₹ 400.00 ₹

पुस्तकाचे नांव : बाबाराव सावरकर एक उपेक्षित राष्ट्रभक्त Babarao Sawarkar Ek Upekshit Rashtrabhakt
प्रकार : चरित्र
पृष्ठसंख्या : १५४
किंमत :  ४०० रु
पहिली आवृत्ती : २८ मे २०२५

प्रकाशक : विजय प्रकाशन

भारताच्या स्वातंत्र्य संग्रामाच्या इतिहासात खऱ्या हिंदुत्वाचे नवे युग सुरु करणाऱ्या युगप्रवर्तक व द्रष्ट्या महापुरुषांच्या यादीतील एक अप्रसिद्ध वा उपेक्षीत नाव म्हणजे बाबाराव. त्यांच कर्तृत्व फार मोठं असुनही ते लोकांपर्यंत पोहोचु शकलं नाही. तिन्ही सावरकर बंधू जर वेगवेगळ्या ठिकाणी जन्माला आले असते तर हिंदुस्थानाला तीन वेगळे क्रांतीसूर्य लाभले असते येवढी गुणवत्ता, गुणग्राहकता तिघांमधेही होती. पण सभा गाजवल्या आणि भारतीयांची मनं जींकलीत ती फक्त तात्यारावांनीच. सावरकर कुटूंबाचा महत्त्वाचा गुण म्हणजे कोणत्याही परिस्थीतीत त्यांनी एकमेकांची साथ कधीच सोडली नाही.

बाबांनी रा. स्व. संघ, हिंदू महासभेद्वारे ‘हिंदु राष्ट्र’ हि संकल्पना रुजवली, संघासाठी अविश्रांत मेहनत घेतली. ‘श्रद्धानंद’ द्वारे हिंदुत्वाची तत्व घरा घरात पोहोचवलीत. गांधी वादावर आणि गांधींच्या सत्य स्वरुपावर निकराचा हल्ला चढवला. हिंदुनी नुसतच सहिष्णु न राहता वेळ प्रसंगी सशस्त्र लढा द्यावा. बाबारांवानी तात्कालीन राजकारणातील जातीय तुष्टीकरण, सिंध विभक्तीकरण, पाकिस्तान विभाजनाची मागणी आदी घातक गोष्टींना कडाडून विरोध केला. अखंड हिंदुस्थानाच्या स्वातंत्र्याचे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या राष्ट्रभक्ताला हे पटणारं नव्हतच. भाषाशुद्धी, लिपीशुद्धी, जातीय शुद्धीकरण यासारख्या चळवळींसाठी बाबाराव सतत लढा देत राहिले. ते फार कुशल संघटक होते. संघटीत राहूनच आपल्याला देशकार्य करता येईल याची त्यांना जाणीव होती. दुसरं महायुद्ध जिंकल्यावर चर्चिलनी हिंदुस्थानाबद्दल म्हटलं होतं ‘हिंदुस्थानाला भ्यायचे कारण नाही कारण तीथे लोकसंख्या म्हणजे फक्त पॉप्युलेशन आहे सोसायटी नाही. म्हणजे कितीही लोकसंख्या असली तरी त्यांची बांधीव संघटना नाही आणि असंघटीत लोक काहीच करू शकत नाहीत. म्हणूनच बाबांच संघटन कौशल्य विशेष महत्त्वाच ठरतं.

Based on 0 reviews

0.0 overall
0
0
0
0
0

Only logged in customers who have purchased this product may leave a review.

There are no reviews yet.