Product Description

पुस्तकाचे नांव : ऑर्गन Organ
लेखकाचे नांव : आशा बगे Asha Bage
प्रकार : कथासंग्रह
किंमत : 220 रु
पृष्ठ संख्या : 190
प्रकाशन दिनांक : 23 फेब्रुवारी 2017
आवृत्ती : पहिली आवृत्ती

‘मारवा’ ते ‘मुद्रा’ या प्रदीर्घ वाटचालीची ही कदाचित अखेर असावी. किंवा आरंभही. लेखकाचे प्रत्येक पुस्तक लेखकाला पहिलेच आहे असे वाटते.

तसेही लेखनाला आरंभ, मध्य, अंत या सूत्रात गोवता येत नसेलही. कागदावर येण्याआधी ते सुरू होऊन गेले असते आणि थांबल्यावरही ते सुरूच राहते. श्रीज्ञानेश्वरांनाही ज्ञानेश्वरीच्या अखेरीला येताना म्हटले आहे…

तैसें पहिले सरते | श्लोक न म्हणावे गीते |

जुनी नवी पारिजाते | आहाती काई |