-10%

जगण्यातले काजवे


पुस्तकाचे नांव : जगण्यातले काजवे Jaganyatale Kajve
प्रकार : ललित
पृष्ठसंख्या : १२०
किंमत :  २५० रु
पहिली आवृत्ती : ३० एप्रिल २०२५

प्रकाशक : विजय प्रकाशन

225.00  250.00 

पुस्तकाचे नांव : जगण्यातले काजवे Jaganyatale Kajve
प्रकार : ललित
पृष्ठसंख्या : १२०
किंमत :  २५० रु
पहिली आवृत्ती : ३० एप्रिल २०२५

प्रकाशक : विजय प्रकाशन

जीवन आणि अनुभव हे खरे तर समानार्थी शब्द आहेत. जोवर जीवन आहे तोवर अनुभव आहे आणि अनुभवांचा शेवट हा जीवनाचाही शेवट आहे. आपल्या वाट्याला येणारे सारेच अनुभव प्रकाशाचे असतात असे नाही. काही अनुभव अंधारयुगाच्याही आठवणी सोचत आणतात. खरे तर चांगल्या वाईट अनुभवांचा हा पाठशिवणीचा खेळ अंधारात चमचमणाऱ्या काजव्यांसारखाच असतो. काजवे क्षणभर प्रकाशतात आणि लगेच अंधारात मिटून जातात. अनुभवांचेही असेच आहे. काही अनुभव आयुष्यावर कायमचे व्रण उठवून जातात तर काही अंगावर येणाऱ्या मंद आणि आनंददायी झुळुकीसारखे असतात. हे सारेच अनुभव लक्षात राहतात, असे नाही. काही आठवावेसेही नसतात; पण तरीही जीवन या आनंददायी आणि दुःखदायी अनुभवांनी भरलेले असतात. त्यातूनही ज्यांची अनुभवसमृद्धता मोठी ती माणसेही मोठी असतात. ज्यांना स्थानिक केवळ आसपासचे अनुभव असतात त्यांचे जगणे फारसे कुणी विचारातही घेत नाहीत. अनुभव हे केवळ वर्तमानकालीनच नसतात ते भूतकालीन आणि बरेचदा सर्वकालीन असतात. ज्यांच्या अनुभवांची सर्वकालीनता मोठी, सार्वत्रिक आणि परिणामकारक असते ती माणसे जगाला बरेच काही देऊन जातात आणि जगही त्यांच्याकडून उपकृत होत असते. सामान्य मध्यवर्गीय माणसांच्या अनुभवांची क्षेत्रे मर्यादित, लहान आणि बहुधा कौटुंबिक व आपल्या अवतीभोवतीच्या माणसांबाबतची असतात. मात्र ती लहान असली, तरी तो घेणाऱ्यांचे जीवन समृद्धीने भरून काढतात. आयुष्य हे सुखदुः खांच्या धाग्यांनी विणलेल्या वस्त्रासारखे असते. या सुख-दुःखांपासून कोणीही फारसा दूर नसतो. धनवंतांच्या आणि सर्वसत्ताधाऱ्यांच्या वाट्यालाही दुःखे येतात आणि दरिद्री व वंचितांच्या वाट्यालाही आनंद व हास्य येत असते.

खरी बाब हे अनुभव घेणाऱ्याचे मन किती संवेदनशील आणि आत्मीयतेने भरले असते ही आहे. अशी मने ज्यांना लाभतात ती माणसे साऱ्यांना आवडतात आणि समाजाच्याही प्रशंसेचा व प्रसंगी लोभाचा विषय होतात. असे होण्याचे भाग्य भाग्यश्री पेठकर हिला लाभले आहे. तिला मी महाविद्यालयीन वयापासून प्रौढत्वाने समृद्ध होतपर्यंत पाहत आलो. ती मला नेहमीच माझ्या मुलीसारखी वाटत आली आणि घरच्या मुलीला जसे पाहावे आणि जाणावे तसे मी तिला पाहत व जाणत आलो. एक कमालीची संवेदनशील, चटकन् डोळ्यांत पाणी आणि दुसऱ्याच क्षणी ओठावर हसू येईल असे तिला जगलेले मी पाहिलेले आहे. तिला सुचलेले ‘जगण्यातले काजवे’ हे नावही बहुधा तिच्या याच प्रकृतीमुळे सुचले असणार. एका प्रचंड दुःखातून स्वतःच्या बळावर धडपडत उठणे आणि आपल्या अस्तित्वाची खूण इतरांना जाणवून देणे ही गोष्ट साधी नाही. शिवाय या प्रवासात आपल्या मनाचे निर्लेप आनंदीपण जपणेही सोपे नाही. भाग्यश्रीला या गोष्टी जमल्या आहेत.

Category:

Based on 0 reviews

0.0 overall
0
0
0
0
0

Only logged in customers who have purchased this product may leave a review.

There are no reviews yet.