-20%
, , ,

पूल नसलेली नदी 


पुस्तकाचे नांव :  पूल नसलेली नदी    
लेखकाचे नांव : प्रफुल्ल शिलेदार   
प्रकार : कथा
पृष्ठसंख्या : 152
किंमत :  300 रु
पहिली आवृत्ती : 10 मे 2024

प्रकाशक : विजय प्रकाशन

240.00  300.00 

पुस्तकाचे नांव :  पूल नसलेली नदी   Pul Nasaleli Nadi 
लेखकाचे नांव : प्रफुल्ल शिलेदार  Prafull Shiledar 
प्रकार : कथा
पृष्ठसंख्या : 152
किंमत :  300 रु
पहिली आवृत्ती : 10 मे 2024

प्रकाशक : विजय प्रकाशन

मानसी या महत्वाच्या मल्याळम् लेखिकेच्या कथांचा प्रफुल्ल शिलेदार यांनी केलेल्या हा अनुवाद अत्यंत रसपूर्ण झालेला आहे. मानसी यांच्या कथेतील प्रखर स्त्रीवादी जाणीवेसह या कथांमधील प्रतीकात्मकता तोलून धरत हा अनुवाद अगदी सहजतेने येतो. या कथांतील स्त्रियांची नावे वेगवेगळी असली तरी खऱ्या अथनि या स्त्रिया केवळ हळदीकुंकवाच्या बदल्यात आपले पंख आणि स्वतःचं मन गमावून बसलेल्या स्त्रिया आहेत. या स्त्रियांच्या जगण्यात अन्याय आणि न्याय या दोन काठांना जोडणारा पूलच नाही. हे जगणे म्हणजे एक पूल नसलेली नदी आहे. स्वतःसोबत जन्मलेली, स्वतःचाच अभिन्न भाग असलेली साधीसुधी स्वप्नेदेखील पूल नसलेल्या नदीसारखीच आहेत, हा मर्माचा आशय या अनुवादात सरसतेने उमटलेला आहे. आशा बगे स्त्री-पुरुषांच्या सत्तासंबंधातील सुखविणाऱ्या-दुखविणाऱ्या तपशिलांची तीव्रता आणि खोली करीत जाणाऱ्या मल्याळम् मानसी यांच्या कथा धारदारपणे बौध्दिक आहेत. एखाद्या शल्यचिकित्सकाच्या कौशल्याने उपरोध आणि मर्मदृष्टीचा वापर करीत असतानाही त्या मानवी संबंधातील आस्थेची हळुवार जपणूक करताना दिसतात. स्त्री-लेखकांमध्ये विरळपणे आढळणारा कथांच्या आकृतीबंधाबाबतचा त्यांचा सजगपणा लक्षणीय आहे. परंपरेचा पुनर्विचार आणि आत्मभानाचा उच्चार करणाऱ्या या कथांची काव्यात्मकता मल्याळम् साहित्यात मानसी विशिष्ट गणली गेली आहे. प्रफुल्ल शिलेदारांनी ही काव्यात्मकता कसोशीने जपून केलेले हे अनुबाद मूळ कथांच्या तरलपणाचा प्रत्यय देतात.

Based on 0 reviews

0.0 overall
0
0
0
0
0

Only logged in customers who have purchased this product may leave a review.

There are no reviews yet.