पुस्तकाचे नांव : माझा मित्र रजनीकांत Majha Mitra Rajnikant
लेखकाचे नांव : अनु. डॉ. अमृत रा. यार्दी Tr. by. Dr. Amrut R. Yadri
प्रकार : चरित्र
पृष्ठसंख्या : २१४
किंमत : २५० रु
पहिली आवृत्ती : ३० एप्रिल २०२५
प्रकाशक : विजय प्रकाशन
आजपर्यंतच्या चित्रपटांचा इतिहास पाहता भारतीय चित्रपटाच्या क्षितिजावर अनेक तारे झळकले. काहींनी तर आपल्या पायवाटा निर्माण केल्या तर काहींनी आपले राजमार्ग बनविले. दादासाहेब फाळके यांचे नाव कोण विसरू शकेल ?
दाक्षिणात्य चित्रपटक्षेत्रातील नट आणि प्रेक्षक यांचे खास असे नाते आहे. भारतातल्या इतर राज्यांमध्ये अशा प्रकारचे नट-प्रेक्षक यांचे नाते फारच थोड्या ठिकाणी पहायला मिळते. एम.जी.आर., जयललिता, शिवाजी गणेशन अशा नट-नट्यांना तिथले चित्रपटरसिक देवासमान मानत. दक्षिणेत चित्रपटगृहांवर गगनगामी उंचीचे नट-नट्यांचे कटआऊटस् लावून त्यांची पूजा करण्याचे वेडे प्रेम ही मोठी कोड्यात टाकणारी गोष्ट आहे.
या पुस्तकाचा केंद्रबिंदू हा रजनीकांत. शिवाजीराव गायकवाड हा रजनीकांत कसा झाला, त्याचे अत्यंत गरिबीतून एवढ्या मोठ्या नटापर्यंतचे खडतर जीबन कसे आहे हे सांगण्याचा अनेकांनी प्रयत्न केला आहे. नटाने समाजाभिमुख असावे असे वाटायला लावणारे अनेक नट मराठी आणि कन्नड चित्रपटक्षेत्रात होऊन गेले.
There are no reviews yet.