पुस्तकाचे नांव : क्षण ओंजळीतले Kshan Onjalitale
लेखकाचे नांव : ज्योती राजेश चव्हाण DJyoti Rajesh Chavhan
प्रकार : कविता
पृष्ठसंख्या : ११०
किंमत : २५० रु
पहिली आवृत्ती : १५ ऑगस्ट २०२५
या समाजात-सभोवतालच्या विश्वात जगत असताना, आपल्या डोळ्यासमोर अनेक घटना-प्रसंग घडत असतात. अनेक व्यक्ती त्यांचे एकूणच व्यवहार आपण पाहत असतो. पण साऱ्यांच्याच मनावर त्यांचा उत्कट असा चांगला-वाईट प्रभाव पडतोच असे नाही. मात्र कवी कवयित्रीचे मन अत्यंत संवेदनशील असते त्यामुळे त्या घटनांचा संवेदनशील मनांच्या अंतरंगात खोलवर परिणाम होतो. तो अनुभव त्यांच्या मनात सतत रुंजी घालतअसतो. आणि तो कधी एखाद्या उत्कट भावनांच्या क्षणी, त्या अंतरंगात पुष्कळ काळ रूंजी घालतो, म्हणजे अधिक सोप्या-सरळ भाषेत, मनात सारखा घोळत असलेला अनुभव शब्दांव्दारे व्यक्त होत असतो. तुकोबांच्या शब्दात ‘अंतरीचे धावे स्वभावेबाहेरी’ असे घडते. एखाद्या कळीचे फुलात रूपांतरण व्हावे तसे हे घडते. ‘stontaneos over flow of powerful feelings.’ कवितेला उत्कट भावनांचा उत्स्फूर्त प्रभावी अविष्कार असे एका आंग्ल कवीने म्हटलेच आहे. हाअविष्कार किती सुंदर आहे, त्याचे स्वरूप कसे आहे हे ज्योती चव्हाण यांच्या कविते संदर्भात सांगता येईल. ती ठळक वैशिष्ट्ये थोडक्यात पुढील प्रमाणे : ज्योती चव्हाण यांच्या या काव्यसंग्रहात, स्त्रीविषयक कविता सर्वाधिक प्रमाणात असणे स्वाभाविक आहे. त्यांनी स्त्री जीवनाचे सूक्ष्म अवलोकन केले आहे. ते नुसतेच केले नाही तर त्याचे काव्यरूपात रेखाटन केले हे महत्त्वाचे. त्यांनी आईची महती गायली आहे.





There are no reviews yet.