Product Description

पुस्तकाचे नांव : माझे हायकू Maze Hayku
लेखकाचे नांव : सुचित्रा कातरकर Suchitra Katarkar
प्रकार : कविता
किंमत : 70 रु
पृष्ठ संख्या : 64
पहिली आवृत्ती : 16 मार्च 2010 (गुढीपाडवा)

हायकू ही अल्पाक्षरी रचना आहे. तो तीन ओळींचा असून प्रामुख्याने निसर्ग हाच त्याचा प्रमुख विषय आहे. बाशो, बसुन आणि इस्सा ह्या तीन हायकूकारांनी पाचशे वर्षांपूर्वी हा काव्यप्रकार लोकप्रिय केला. आयुष्यभर ते हायकूच लिहीत राहिले. बाशो तर म्हणे की प्रत्येक हायकूकारांने रोज एक हायकू लिहावा, मरेपर्यंत लिहावा आणि मरतानाही लिहावा.