पुस्तकाचे नांव : मी कोण ? Mee Kon ??
लेखकाचे नांव : जुल्फी शेख Julfi Sheikh
प्रकार : कविता
पृष्ठसंख्या : ८२
किंमत : १६० रु
पहिली आवृत्ती : १० मे २०००
प्रकाशक : विजय प्रकाशन
फुलवातीचं काम करणाऱ्या प्रतिनिधिक संग्रहाचे सारथ्य करणारी ही रचना आत्मिक अनुभवाची जाण देतांना वैश्विक अनुभव आपल्या कवेत सामावून घेते. यात दिसते स्त्रिच्या अस्तित्वाचे, भोगाचे, अगतिकतेचे आणि सहनशिलतेचे एक एक टप्पे या कवयित्रीच्या प्रवासातले निदर्शक आहेत.कुठलाही विषय यांच्या जाणिवेच्या कक्षेतून सूटत नाही, मग कारगिल असू दे, पोखरण असू दे किंवा भोपाळच्या इंडस्ट्रितील रिसणारा द्रव असू दे, या संगळ्यांच्या भक्ष्य स्थानी समर्पित होते ती स्त्री कुश ! या जाणिवेच्या आधारावर अख्ख्या विश्वाला समतेची धारणा देऊन ही स्री प्रतिज्ञा बाहते.
किंवा
“बिज एक माग भूमी, अर्पिण वंश गोणी या देशाच्या स्वातंत्र्य यज्ञात देण्यास माझ्या समिधा अपूऱ्या नाहीत भगतसिंग, अन्वर यांच्या माळेत पहिला बळी मजीद मीच आहे.अश्या तन्हेने आपल्या कर्तृत्वाची ऋण फेडीची साक्ष ही कवयित्री ‘मी कोण ?’या एका प्रश्नांकित भोवऱ्यात सबंध जीवंत प्रश्न घेऊन येते. त्यात उमेदीची आब, अस्तित्वाची ताब, प्रितीने वावरणाऱ्या जोडप्याचे दाखली यांनी आपल्या कवितेतून देतांना दोन रुळावरील बाहावा, संसार क्षणाक्षणांचा…
रोटी कपडा और मकान…. किंवा
‘तुम्हारे पैर जमिन पर मत उतारिये मैले हो जाएंगे’ अश्या बाक्प्रचारातून वळणे आणि वळसे घेत रेशीम पदराच्या गोठवलेल्या कथा यातून स्त्री कहानी मांडली आहे।
सतीत्व ना मी आम्ही, पून्हा भूमिगत होणार नाही केलेत पाच वाटे, माझ्या श्री शिलाचे पून्हा चौदावर्षिय बिरहाचे, उमाळे आम्हाला येणार नाहीत ।
– रचनेतील सामर्थ्य एका वेगळ्या झटीती प्रत्ययातून येतो. मानवी मुल्यांची पडझड आणि वैश्विक समस्या यांच्या जोडीला यांचे देशभान सदैव जागृत असते. म्हणून या सगळ्या पोखरणाला जबाबदार कोण? तर भारतापूरते बोलायचे झाल्यास कवयित्रीने दिलेले उत्तर ‘फाळणी’ हेच होय !






There are no reviews yet.