Product Description

पुस्तकाचे नांव : अर्धउत्क्रांत Ardhutkrant
लेखकाचे नांव : श्रीकांत मुळे Shrikant Mule
प्रकार : कादंबरी
किंमत : 250 रु
पृष्ठ संख्या : 208
पहिली आवृत्ती : 10 मार्च 2015

श्रीकांत मुळे यांच्या लेखनाचा कथा, दीर्घकथा असा उत्क्रांत होत जाणारा प्रवास आता कादंबरीपर्यंत आला आहे. हा प्रवास त्यांच्या वाङ् मयविषयक चिंतनातून आणि अनुभवाच्या स्वाभाविक प्रतीतीतून झाला आहे, हे इथे नमूद करणे आवश्यक आहे. अर्धउत्क्रांत ही त्यांची पहिलीच कादंबरी. पण नवखेपणाच्या सगळ्या सीमा पार करून ती उभी राहणारी अशी आहे. साहित्याच्या, निर्मितीच्या ध्यासाने झपाटलेल्या एका मराठीच्या प्राध्यापकाच्या प्रमाथी जगण्याचा आणि त्याच्या जीवनातील चढ-उतारांचा, अर्धउत्क्रांत मध्ये मांडला गेलेला आलेख आदर्शांच्या आणि तात्त्विक फूटपट्ट्यांच्या पलीकडे जाणारा आहे. त्यामुळे एकीकडे ही कथा एका निर्मितीशील लेखकाची वाटत असली तरी त्याचवेळी ती सर्वसामान्यांच्या भावविश्वशीही नाते जोडणारी ठरते.

डॉ. रवींद्र शोभणे