पुस्तकाचे नांव : अहिल्याबाई होळकर : जीवन समिधा Ahilyabai Holkar : Jeewan Samidha
लेखकाचे नांव : डॉ . मंजुश्री विक्रांत सरदेशपांडे Dr. Manjushri Vikrant Sardeshpande
प्रकार : चरित्र
पृष्ठसंख्या : ८६
किंमत : १५० रु
पहिली आवृत्ती : २८ जून २०२५
प्रकाशक : विजय प्रकाशन
अहिल्याबाई होळकर : जीवन समिधा’ हे चरित्र म्हणजे त्यांच्या जीवनयज्ञात अर्पण झालेल्या प्रत्येक क्षणाची प्रदीप्त कहाणी आहे. ‘समिधा’ हा शब्द येथे केवळ रूपक नाही तर त्या युगंधर स्त्रीच्या अंतरंगातील तपश्चर्येचे, संघर्षाचे आणि सेवा-भावनेचे प्रतीक आहे.
डॉ.सौ. मंजुश्री विक्रांत सरदेशपांडे यांनी अहिल्याबाईंच्या व्यक्तिमत्त्वाचे केवळ ऐतिहासिक नव्हे, तर सामाजिक, आध्यात्मिक आणि स्त्री-प्रेरणादायी पैलूंनी सखोल दर्शन घडवले आहे. अहिल्याबाईंचा एकाकी प्रवास, त्यांची शौर्यगाथा, सामाजिक न्यायाचा भक्कम कणा, आणि सर्वसामान्य जनतेप्रती असलेली करुणा-हे सारेच शब्दांतून सजीव होतं.
हे पुस्तक प्रत्येक बाचकासाठी केवळ चरित्र नसून ध्येय, दिशा आणि दीपस्तंभ आहे-विशेषतः आजच्या स्त्रीसाठी !






There are no reviews yet.