Product Description

पुस्तकाचे नांव : नरक मसीहा Narak Masiha 
लेखकाचे नांव : भगवानदास मोरवाल Bhagvandas Morval      अनुवाद : चंद्रकांत भोंजाळ chandrakant bhoanjal

प्रकार : कादंबरी
किंमत : 395 रु
पृष्ठ संख्या : 296
पहिली आवृत्ती : 6 जून 2019

आपल्या देशात एनजीओंचे जाळे सर्वदूर पसरलेले आहे. ‘एनजीओ’ ह्या परजीवी वनस्पतींंसारख्या असतात. त्यांचे कार्य वरवर तशी तुम्हाला भुरळ घालते; पण ‘चकाकणारे सगळेच सोने नसते’ ह्या न्यायाने एनजीओंच्या कार्याकडे पहायला हवे. ही परजीवी वेळ ज्या वृक्षावर चढते त्या वृक्षाचा सगळा जीवनरसच शोषून घेते. ह्या एनजीओ सरकारी अनुदान, समाजाकडून मिळालेल्या देणग्या, परदेशी संस्थांंकडून  मिळालेली आर्थिक मदत, आणि समाजाकडून जमा केलेली वर्गणी ह्यांच्या आधारे चालतात. वरवर पहिले तर त्यांचे कार्य हे समाजहिताचे असते. समाजाचे उत्थान करणे हाच त्यांचा उद्देश असतो. जवळ जवळ प्रत्येक एनजीओंच्या प्रमुख कामात आणि उद्देशात महिला सशक्तीकरण, पर्यावरण संरक्षण, वृद्धसेवा, बालकल्याण, युवकल्याण ह्या गोष्टींचा समावेश असतो. पण वास्तविकता ह्या पासून कोसो दूर असते. 

मागील वर्षी देशातील असंख्य एनजीओंवर सरकारने बंदी घातली, तर काही एनजीओंवर  निर्बंध लादण्यात आले. असंख्य एनजीओंनी परदेशातून मिळालेल्या पैशाची कहा वर्षांत हिशेबच दिलेला नव्हता. त्यामुळे आपल्या मनात असलेल्या एनजीओच्या प्रतिमेला धक्का बसला.

एनजीओंंची दुसरी बाजू उघडी करणारी ही कादंबरी…