Product Description

पुस्तकाचे नांव : विसाजी कृष्ण बिनीवाले : काळ आणि कर्तुत्त्व Visaji Krushna Biniwale : Kal Aani Kartuttva
लेखकाचे नांव : डॉ. सुनीता सरायकर Dr. Sunita Saraykar
प्रकार : साहित्य समीक्षा
किंमत : 170 रु
पृष्ठ संख्या : 163
पहिली आवृत्ती : 7 मार्च 2007

प्रस्तुत पुस्तकात विसाजी कृष्ण बिनीवाले यांच्या इ. स. 1740 ते 1785 या कार्यकाळातील त्यांच्या कामगिरीचे चिकित्सक दृष्टीने परीक्षण केलेले आहे. विसाजी कृष्णांच्या कामगिरीच्या निमित्ताने त्याकाळातील मराठ्यांच्या राजनीतीवर प्रकाश पडतो हे महत्त्वाचे आहेच. लेखिकेने ह्या संशोधनासाठी नव्याने उपलब्ध झालेली अप्रकाशित आणि प्रकाशित कागदपत्रे ह्यांचा आधार घेऊन अभ्यास केलेला आहे. कालचक्रात दडलेल्या काही घटनांना प्रकाशात आणण्याच्या हेतूने मान्यवर इतिहासकारांच्या मतांच्या आधारे लेखिकेने काही नवे निष्कर्ष प्रस्तुत पुस्तकात काढलेले आहेत. यासाठी अप्रकाशित आणि प्रकाशित दोन्ही प्रकारच्या साधनसामुग्रीचा उपयोग केलेला आहे.