Product Description

पुस्तकाचे नांव : कजरी  Kajri
लेखकाचे नांव : मीनल बडगे Minal Badge
प्रकार : कादंबरी
किंमत : 100 रु
पृष्ठ संख्या : 59
पहिली आवृत्ती : 6 जून 2019

सामाजिक परिप्रेक्ष्यात अलक्षित जीवन जगणाऱ्या एका मोठ्या समूहाचा एक घटक म्हणून वेश्याजीवनाचा विचार करावा लागतो. मानवी मूल्यांच्या अधोगतीची ही पायवाट जात – धर्म – संस्कृतीला पोटात घालून पुरातन काळापासून चालत आलेली आहे. वेश्यावसतींचे समर्थन वेश्येतर जीवनातल्या सुख- शांतीच्या संदर्भात करणे, हे किती तकलादू, दुटप्पी आणि अमानवीय आहे,हेही समजून घेणे गरजेचे आहे.

अशा जीवनाच्या विविधांगी व्यथा वेदनांचा शोध घेण्याचा प्रामाणिक प्रयत्न ‘कजरी’ या कादंबरीच्या निमित्ताने श्री. मीनल बडगे यांनी केला आहे. या जीवनाकडे अतिशय गांभीर्याने आणि संवेदनशील बृत्तीने पाहण्याची अभ्यासुवृत्ती आणि समंजस प्रकृती अलीकादेच्या लेखकांनी आपल्या याप्रकारच्या लेखनातून दाखविणे, हे मराठी साहित्याच्या दृष्टीने निश्चितच आशादायी स्वरूपाचे आहे. 

‘कजरी’ ही या वाटेने प्रवास करणारी कादंबरी आहे, हे विशेष.