Product Description

पुस्तकाचे नांव : मनातील ऋतूंच्या नोंदी Manatil Rutunchya Nondi
लेखकाचे नांव : वसंत वाहोकार Vasant Vahokar
प्रकार :  कवितासंग्रह
पृष्ठ संख्या : 121
किंमत : 125 रु
पहिली आवृत्ती : ऑगस्ट 2012

वसंत वाहोकार यांची वाड्मयमूर्ती ही त्री-मुखी आहे. कवितालेखना सोबतच कथालेखन व सदरात्मक लेखन त्यांनी लक्षणीय पद्धतीने केलेले आहे. तरीही त्यांचा प्रतिभाधर्म हा मुख्यत्वाने काव्याभिव्यक्तीचाच आहे असे वाटते.
“शब्दांनी दिली ना शपथ… आपण घेतली
आता जन्ममरणाची मिठीच घातली”
असे वाहोकारांनी कवितालेखनाच्या संदर्भात म्हटले आहे.